संगीता शेटे अकोल्याच्या बिनविरोध नगराध्यक्ष 

आज अधिकृत घोषणा ः निशिगंधा, सोनाली नाईकवाडींची माघार
अकोले  – नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संगीता अविनाश शेटे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधात नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादीच्याच नगरसेवक निशिगंधा नाईकवाडी व भाजपच्या नगरसेवक सोनाली नाईकवाडी यांनी अर्ज मागे घेतले.
निवडणूक कार्यक्रमानुसार 23 मे रोजी निवडीची अधिकृत घोषणा होईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी 15 नगरसेवकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू, अशी तयारी नगरसेवकांनी दर्शवली होती. परंतु, पक्षांतर्गत धुसफूस होऊन निशिगंधा नाईकवाडी यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. परंतु, पक्षाचे गटनेते बाळासाहेब वडजे यांनी पक्षीय व्हीप पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने जारी केला. यानंतर नाईकवाडी यांनी आपले बंड गुंडाळले. आदेश मान्य न केल्यास पद धोक्‍यात येईल याचा अंदाज घेत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला, असे म्हणण्यास या माघारीमुळे वाव आहे.
पक्षीय बलाबल नसताना सोनाली नाईकवाडी यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, राजकीय घडामोडी वेगाने घडल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे शेटे यांची निवड बिनविरोध झाली.
बुधवारी उपनगराध्यक्षाची निवड होत आहे. पक्षश्रेष्ठी उपनगराध्यक्ष बदलणार, अशी येथील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे प्रकाश नाईकवाडी यांची जागा गटनेते बाळासाहेब वडजे घेणार, अशी चर्चा होत आहे. हे पद कोणाकडे जाणार याबाबत उत्सुकता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)