संगीतावर आधारित अभ्यासक्रमांची निर्मिती

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्रातर्फे (ईएमआरसी) शास्त्रीय संगीतावर आधारित दोन अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात आली असून, त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. हे अभ्यासक्रम विनाशुल्क व सर्वांसाठी खुले आहेत. त्यासाठी “स्वयंम’ या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यातील पहिला अभ्यासक्रम “दुस्थानी राग संगीत- सत्र’ प्रा. शारंगधर साठे यांनी विकसित केला आहे. त्यात पं. नयन घोष, पं. रोणू मजुमदार, पं. विजय कोपरकर, विदुषी आरती अंकलीकर आणि प्रा. शारंगधर साठे या कलाकारांचे सादरीकरण आहे. या अभ्यासक्रमाद्वारे रागांबद्दलची माहिती, विविध ताना, पलटे, अलंकार शिकणे, मैफिलीत राग प्रस्तुती करणे, इत्यादी गोष्टी शिकावयास मिळतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसरा अभ्यासक्रम “फंटामेंटलस्‌ ऑफ पर्क्‍युशन- तबला’ हा पं. रामदास पळसुले यांनी विकसित केला आहे. यामध्ये पं. सदानंद नायमपल्ली, पं. नयन घोष, पं. अरविंदकुमार आझाद, पं उमेश मोघे आणि पं. रामदास पळसुले या कलाकारांचे सादरीकरण आहे. या अभ्यासक्रमाद्वारे तबला व तालांसंबंधीची माहिती, ताल व तबला वादनातील विविध रचना लिपीबद्ध करणे, विविध रचना शिकणे तसेच तबला एकल वादन प्रस्तुती शिकता येईल. हे दोन्ही अभ्यासक्रम ईएमआरसीतर्फे श्री. श्रीकांत ठकार यांनी तयार केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)