संगम माहुलीला तिर्थक्षेत्र ब वर्ग मिळावा

ग्रामस्थांचे ना. चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन

सातारा, दि. 1 (प्रतिनिधी) – संगम माहुलीला तिर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा मिळावा, अशी मागणी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कोरेगाव मतदार संघातील भाजपचे नेते महेश शिंदे व माजी जि. प. सदस्य संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच ना. चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, संगम माहुली तिर्थक्षेत्रास क वर्ग दर्जा आहे. या गावात छत्रपती घराण्यातील ऐतिहासिक समाधीस्थळे आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर धार्मिक मंदिरे आहेत. तसेच कृष्णा-वेण्णा नदीचा संगम असून रोज संगम माहुली गावाला हजारो पर्यटक भेट देतात. यामुळे हजारो पर्यटक व ग्रामस्थांना सेवा-सुविधा पुरवण्यासाठी निधी कमी पडतो. त्यामुळे या तिर्थक्षेत्रास संगम माहुली ब वर्ग दर्जा मिळावा, अशी मागणी ना. चंद्रकांतनदादांना पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर लवकरच संगम माहुलीला ब वर्ग दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही ना. पाटील यांनी दिली.
याप्रसंगी सातारा तालुका उपाध्यक्ष राहुल शिवनामे. ग्रा. प. सदस्य प्रकाश माने व माजी उपसरपंच अंकुश पडवळ, माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल बरकडे, माजी ग्रामपंचायत सदस्य विकास शिंदे, ह.भ.प.चे जगन्नाथ शिंदे, संगम माहूली गावातील प्रतिष्ठित शेतकरी दत्तानाना सुर्यवंशी, नरेंद्र सावंत, प्रकाश नेवशे, प्रवीण शिंदे, उमेश पवार, स्वप्निल सुर्यवशी, सुरज शिंदे, संजय शिंदे, धनंजय शिंदे, वैभव शिंदे, सुमित शिंदे, प्रदिप कदम, मच्छिंद्र कदम, संगम माहूली ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ व संगम माहुली गावातील सर्व सार्वजनिक मंडळे यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)