संगमब्रीज येथे पाच वर्षांचा मुलगा बुडाला

संगमब्रीज येथे पाच वर्षांचा मुलगा बुडाला
पुणे, दि.27 – संगमब्रीज येथील नदीपात्रात पाच वर्षांचा मुलगा बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या मुलाला नदी पात्रात शोधण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
संगमवाडी ब्रीज येथील नदीपात्रालगत छोटी वस्ती आहे. या वस्तीतील दोन मुले सायकल खेळत होती. यावेळी यातील एक मुलगा रस्त्याच्या उतारावरून सायकलसह नदीमध्ये पडला. त्याच्या साथीदाराने याची माहिती घरच्यांना दिली. यानंतर तातडीने अग्निशमन दलाला तसेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान सायंकाळी उशीरापर्यंत नदीपात्रात प्रत्यक्षात उतरुण तसेच गळ टाकून मुलाचा शोध घेत होते. मुलाचे कुटुंबीय व नातेवाईकांना या घटनेचा मोठा धक्का बसला होता. यासंदर्भात खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोरे हे कर्मचाऱ्यांस घटनास्थळी शोधकार्य करत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)