संगमनेर : उत्तमराव भोसले यांचे अकस्मित निधन

संगमनेेर : दैनिक युवावार्ताचे उपसंपादक म्हणुन कार्यरत असणारे उत्तमराव श्रीरंग भोसले यांचे शनिवार 28 एप्रिल रोजी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मृत्युसमयी ते 48 वर्षांचे होते. रविवारी त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळगावी मेंढवण येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कै. उत्तमराव भोसले यांनी गेली सहा वर्षे दै. युवावार्ता कार्यालयात उपसंपादक म्हणुन यशस्वी काम केले. अत्यंत मितभाषी व मोठा मित्र परिवार असणारा, सर्वांशी स्नेह मैत्री जपणारे असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. वर्तमानपत्रासोबत इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्येही त्यांनी काम केले. अत्यंत प्रामाणिक, वृत्तपत्रक्षेत्राशी निष्ठा असणारे व वेळप्रसंगी अनेकांना मदतीचा हात देणारे उत्तमराव भोसले यांच्या अकस्मीत जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. भोसले परिवाराबरोबरच त्यांचा मित्रपरिवार, प्रसारमाध्यमी यांची  प्रचंड हानी झाली आहे.
भोसले यांच्या पश्‍चात आई-वडील, पाच भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांची पत्नी महात्मा फुले कृषी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणुन कार्यरत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)