संगमनेर : साकुरमध्ये रामनवमी उत्साहात साजरी

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील साकुर येथे प्रथमच यावर्षीपासून श्रीरामनवमी साजरी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या वर्षीच्या रामनवमीचे आयोजन साकुर पठार भागाच्या वतीने करण्यात आले होते.   पठार भागातील तरुणांनी  एकञ येत रामनवमी मोठ्या  उत्साहात आणि भक्ती भावाने साजरी केली.

रविवारी दुपारी साकुर चौफुली ते साकुर गावात रामाची  ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत फुलांच्या हारांनी रथ सजविण्यात आला होता. तसेच रामनवमीचे औचित्य साधून लहान मुलांनी श्री राम, लक्ष्मण, सिता तसेच हनुमानाची हुबेहुब वेषभूषा करत मिरवणुकीतील राम भक्तांचे मने जिंकली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)