संगमनेर शहरात धुमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

संगमनेर : संगमनेर शहरात सार्वजनिक बांधकाम कार्यालयाजवळ एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे गंठण चोरून दोघा चोरट्यांनी धुमस्टाईलने पोबारा केल्याची घटना रविवारी २९ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या घडली. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिलीप कारभारी साळगट कुटुंबासह शहरातील इंदिरानगर याठिकाणी राहतात.

रविवारी दुपारी पत्नीसह दोघे जण अल्टो कारमधून भाजीपाला आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आले. साळगट यांची पत्नी यांनी भाजीपाला घेऊन कारमध्ये बसण्यासाठी आल्या असता त्याच दरम्यान मोटारसायकलवरून मागून आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. एकूण ७० हजार रुपये किंमतीचे हे सोन्याचे गंठण होते. याप्रकरणी दिलीप साळगट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १३७ / २०१८ भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंकज निकम करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)