संगमनेर शहरात दारु अड्ड्यावर छापा

संगमनेर – शहरातील दारू अड्ड्यांवर पोलिसांनी शुक्रवारी धडक करवाई केली. या कारवाईत इंदिरानगर दारू अड्ड्यावर कारवाई करण्यात आली असून 33 हजार 130 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे व पथकाने शुक्रवारी दुपारी 2 वाजता संगमनेर शहरातील नगरपालिका क्रीडा संकुलनच्या पाठीमागे वडार वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंद पडलेल्या घराच्या आडोशाला भाऊसाहेब सदाशिव भागवत (रा. इंदीरानगर) यांच्याकडे 73 देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व यमा कंपनीची दुचाकी असा एकूण 33 हजार 130 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

-Ads-

या कारवाईत पोलीस निरीक्षक सी.आर. गावंडे, विजय पवार, बाळासाहेब आहिरे, सुभाष गोडसे, अमृत आढाव, आशिष कुंडलिक यांचा समावेश होता. पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)