संगमनेर शहरात तरुणाकडून गावठी कट्टा जप्त

संगमनेर – संगमनेर शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री शहरातून जयजवान चौकात एका तरुणाकडून गावठी कट्टा हस्तगत केला. पोलिसांना मिशन ऑल आऊट अंतर्गत केलेल्या कारवाईत थेट गावठी कट्टाच सापडल्याने येथील गुन्हेगारीवर पोलिसांच्या कारवाईने शिक्कामोर्तब झाले. दत्ता सुधाकर चव्हाण असे पोलिसांनी कारवाई केलेल्या आरोपीचे नाव आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकूळ औताडे गेल्या काही दिवसांपासून रजेवर असताना तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांच्या प्रभारी कार्यकाळात मिशन ऑल आऊट अंतर्गत आतापर्यंत दोन महत्त्वपूर्ण कारवाया करण्यात आल्या. यापूर्वीच्या कारवाईत गेल्या आठवड्यात पोलिसांनी तलवार, जंबिया, मोटारसायकली आणि सुरा हस्तगत केला होता. कालच्या कारवाईत थेट गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केल्याने शहरात बेकायदा गावठी कट्टे येत असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे.

नाशिक-पुणे मार्गावर जयजवान चौकात हॉटेल सरस्वतीजवळ रात्री अडीच वाजता पोलीस पथकाने संशयित दत्ता चव्हाण (वय 24, रा. इंदिरानगर, संगमनेर) याची तपासणी केली असता त्याच्याकडे 25 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा व 400 रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस, 50 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 75 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्या विरोधात पोलीस कर्मचारी आशिष आरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)