संगमनेर शहरात गावठी कट्टा, जिवंत काडतुसे जप्त

संगमनेर : संगमनेर पोलिसांच्या पथकाने संगमनेर शहरातील जयजवान चौक येथे गावठी कट्टा सह एका तरूणाला अटक केली. गुरुवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

दत्ता सुधाकर चव्हाण (वय २४ रा. इंदिरानगर, संगमनेर) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्याकडून २५ हजार रूपये कितीचा एक गावठी कट्टा व ४०० रूपये कितीचे दोन जिवंत काडतूस, ५० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ७५  हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चव्हाण याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पो.नि. आशिष आरवडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)