संगमनेर शंभर टक्‍के बंद

संगमनेर – महाराष्ट्र बंदला संगमनेरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण शहर व तालुक्‍यात कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा आरक्षणासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून बससेवा बंद करण्यात आली. शहर व तालुक्‍यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले होते.

आज शहरात सकाळीच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रभात फेरी काढून बंदचे आवाहन केले. शहरातील दुकानदार, व्यापारी यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. आज सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोटारसायकल रॅली काढली. मोठ्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेतला होता. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. बहुसंख्य मराठा बांधव सहभागी झाले होते. गवंडीपुरा, मेनरोड, बाजारपेठ, तेलीखुंट, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक, रंगारगल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक आदी ठिकाणाहून ही रॅली मार्गस्थ होत आहे.आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे रॅलीत सहभागी झाले होते.संगमनेरातील मुस्लीम समाजाच्या वतीने सकल मराठा मोर्चास पाठिंबा देण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या रॅलीत राजाभाऊ देशमुख, शरद थोरात, अमोल खताळ, अजय फटांगरे, अमोल कवडे, खंडू सातपुते, रामहरी कतोरे, मिलिंद कानवडे, अविनाश थोरात, रमेश गुंजाळ, विलास नवले, महेश वकचौरे, अजय सोनवणे, संजय औटी, आशिष कोठवळ, धीरज देशमुख, प्रशांत वामन, व्यंकटेश देशमुख, डॉ. श्रद्धा वाणी, डॉ. दीपाली पानसरे, सुवर्णा खताळ, डॉ. नीलम शिंदे यांच्यासह सहभाग तरुणांनी सहभाग घेत सर्व व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.
आश्वी परिसरातील आठवडे बाजार बंद ठेवत ग्रामीण भागातील घारगाव, बोटा, तळेगाव दिघे, वडगावपान, निमोण, धांदरफळ, चकणी, पेमगिरी, घुलेवाडी, झरेकाठे सह सर्वच गावांमध्ये शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात आला. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आंबी फाटा येथे मुंडण आंदोलन करण्यात आले. या बंदला पाठिंबा देत अमृत उद्योग समूहाने आज कडकडीत बंद ठेवून पाठींबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)