संगमनेर : वृद्ध महिलेचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील कासारे येथे एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा विनयभंग करण्यात आला. सोमवारी २१ मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासारे गावात असलेल्या सरकारी दवाखान्यासमोरून रस्त्याने सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ६५ वर्षीय वृद्ध महिला जात असताना आरोपी संजय दादा सोनवणे (रा. कासारे) याने तिला पाठीमागून कवळी मारून ‘चल कुठे तरी जावू’ असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

यावेळी महिलेस सोडविण्यास मध्ये पडलेल्या साक्षीदारांना आरोपीने शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. तशा आशयाची फिर्याद पिडीत महिलेने पोलिसांत दिली. याप्रकरणी आरोपी संजय सोनवणे याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ७६/२०१८ भा.दं.वि. ३५४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार अशोक जांभूळकर अधिक तपास करीत आहे..


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)