संगमनेर : विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील झरेकाठी शिवारातील शेतकरी लक्ष्मण दगडू वाणी यांच्या विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू झालाल्यामुळे आश्वी परिसरात एकचं खळबळ उडाली आहे. झरेकाठी शिवारात शेतकरी लक्ष्मण दगडू वाणी यांची गट नं ८९ मध्ये शेतजमीन असून, त्यामध्ये विहीर आहे. शुक्रवारी लक्ष्मण वाणी हे शेतावरील विहरीवर गेल्यानतंर बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात आले. त्यानी तात्कांळ संगमनेर येथिल वनविभागाला याबाबद् माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी व स्थानिकाच्या मदतीने बिबट्याचा मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी जोर्वे येथिल पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुजाळ यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले तर वनविभागाने घटनेचा पंचनामा केला.

आश्वीसह परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे बिबट्याचा वावर वाढला असून दिवसाढवळ्या बिबट्या लोकांच्या  नजरेस पडत आहे. तर अनेक ठिकाणी भुकेने व्याकूळ झालेले बिबट्ये माणसानवर हल्ले करत असल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे येथिल शेतकऱ्यांना  रात्रीच्या वेळेस  शेतीला पाणी देणेसुध्दा कठीण झाले आहे. याबाबद् वनविभागाला सूचना देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याने वनविभागा विषयी सर्वसामान्य नागरीकाच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)