संगमनेर : विद्या निकेतन स्कुल व ज्युनिअर कॉलेज मध्ये वृक्ष दिंडीतून जनजागृती

संगमनेर : पर्यावरणाचा बिघड़त असलेला समतोल यामुळे पाउसाच्या प्रमाणात झालेली घट दुष्काळजन्य परिस्थिती यांच्यावर मात करण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज आहे त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करण्याचे आवाहन विद्या निकेतन स्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सुनिता कडपा यांनी केले.

विद्या निकेतन स्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थीनी शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड अभियानात सहभागी होत बोटा गावामधुन झाड़े लावा झाड़े जगवा, अश्या घोषणा देत पर्यावरण व वृक्ष संवर्धन जपण्यासाठी वृक्ष दिंडीचे आयोजन केले होते, यावेळी संपूर्ण गावातुन जनजागृती करीत विद्यार्थ्यानी फेरी काढली, तदन्तर विद्यालयाच्या प्रांगणात पर्यावरण पूरक वृक्षाची लागवड करीत वृक्षाचे संगोपन करण्याची जवाबदारी घेत वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात आला.

या वृक्षदिंडी वेळी प्राचार्य सुनिता कडपा, इंजिनिअरींग कॉलेज प्रचार्य सिद्धलिंगेश, रजिस्टर दिपाली मिंडे यांच्या सह सर्व शिक्षक कर्मचारी दिंडी मधे सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)