संगमनेर : रामनवमीच्या मुहूर्तावर भूमिपूजन व उद्घाटन समारंभाचे आयोजन

संगमनेर तालुक्यातील राजकियदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आश्वी बुद्रूक ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सत्ताधारी शेतकरी विकास मंडळाच्या सदस्यांनी निवडणुक काळात दिलेल्या वचनाप्रमाणे आज रामनवमीच्या मुहूर्तावर भूमिपूजन व उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते.

गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत ग्रामपंचायतीच्या सत्तेची सुत्रे हाती घेतल्यानंतर  तातडीने कामांना सुरुवात झाली होती. त्यातील पूर्ण झालेल्या कामांपैकी गावठाणातील २०१६ – १७ च्या १४ व्या वित्त आयोगातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणातील प्रशांत गांधी यांचे घर ते समाजमंदिर या  रस्त्याचे काम, दलित स्मशान भुमिच्या आर. सी. सी. संरक्षक भिंतीचे बांधकाम व रंगकाम तसेच बाजारतळावरील नवीन जलशुध्दीकरण प्रकल्पाचे उद्घाटन आज करण्यात आले.

तसेच विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून, गायरान वस्तीतील सुमारे २ लाख रुपये खर्चाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या डोंगरी विकास निधीतून घेण्यात आलेल्या आश्वी बुद्रूक ते मांची रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील ४५० मीटर्सच्या डांबरीकरणाच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत १९ लाभार्थींना गॅसचे व ग्रामपंचायत ३ टक्के अपंग निधीतील ३३ धनादेशांचे वाटप करण्यात आले.

या वेळी जेष्ठ नेते अॅड. शाळीग्राम होडगर, बाळासाहेब गायकवाड, सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, भाऊसाहेब मदने, बाळासाहेब जऱ्हाड, नामदेव मदने, सिताराम होडगर, योगेश पिलगर, भाऊसाहेब ताजणे, तान्हाजी गायकवाड मच्छींद्र होडगर, रामकिसन उंबरकर, रावसाहेब पिलगर, रामनाथ मदने, भाऊसाहेब ताजणे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे, कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)