संगमनेर : शहरातील मालदाड रोड परिसरात चालणाऱ्या एका जुगार अड्यावर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता पोलिसांनी 13 हजार 170 रुपये रोख व जुगारीचे साहित्य जप्त करत 14 जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की मालदाड रोड भागात राहणारा अमोल सुभाष म्हस्के याच्या घरात तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती खबरयमार्फत प्रभारी पो. नि. सुनील पाटील यांना समजली त्यांनी तात्काळ पोलीस पथकास पाठवून छापा मारण्याचे आदेश दिले पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता अमोल सुभाष म्हस्के (रा. मालदाड रोड), विजय सुरेश गुंजाळ, साहेबराव राजू पवार, मनोज अण्णा पवार (रा. वडारवाडी), धीरज विनोद कळसकर, गोविंद लकप्पा दासरी (रा. विडी कामगार सोसायटी), शुभम हिरामण शिंदे, लखन मारुती शिंदे, साईनाथ अंनमलग शिंदे, प्रवीण राजेंद्र गायकवाड  (रा. शिवाजी नगर), निलेश हरिभाऊ टोपे (रा. मालदाड रोड), नयन राजेंद्र मुर्तडकरा  (रा. राहाने मळा), शरद विठ्ठल शिंदे, कृष्णा राजेंद्र भडांगे (रा. दत्ता देशमुख नगर),  या तेरा जणांना तिरट नावाचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.

याबाबत पो. कॉ. अमृत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौदा जणांच्या विरोधात मुंबई जुगार ऍक्ट नुसार गुन्हा दाखल कारण्यात आला असून त्याना ताब्यात घेण्यात आले असून नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)