संगमनेर महाविद्यालयात शहीद दिन साजरा

संगमनेर : संगमनेर महाविद्यालयात शहीद दिनानिमित्त भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.के.के.देशमुख, उपप्राचार्य डॉ.रवींद्र ताशिलदार, रजिस्ट्रार श्री.संतोष फापाळे, श्री.साहेबराव तुपसुंदर, श्री.विजय पाटील, श्री.संजय महाले, श्री.भानुदास सोनवणे व श्री.दिपक पवार आदी शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.के.के. देशमुख म्हणाले की, देशभक्त आणि क्रांतीवीर यांच्याबद्दल आपल्या सर्वांनाच आदर आहे. ज्यांनी आपल्या देशासाठी स्वत:चे प्राणही द्यायला मागेपूढे पाहीले नाही अशा या क्रांतीवीरांचे स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे योगदान फारच महत्वाचे आहे. त्यांच्यामुळेच आपण आपल्या देशामध्ये मुक्तपणे फिरत आहोत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रजिस्ट्रार श्री.संतोष फापाळे म्हणाले की, शहीद भगत सिंग हे अगदी विद्यार्थी दशेपासुनच देशभक्तीने झपाटलेले होते. भगतसिंग यांनी हसत हसत फासावर जाताना तरुणांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम केले होते. भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना ब्रिटीशांनी 23 मार्च रोजी फासावर चढविले. म्हणुनच हा दिवस या वीरांच्या स्मरणार्थ संपूर्ण भारतात शहीद दिन म्हणुन पाळला जातो.याप्रसंगी विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  विजय पाटील यांनी मानले यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)