संगमनेर महाविद्यालयातील ‘कमवा आणि शिका’चे विद्यार्थी गिरवताय कौशल्य विकासाचे धडे

संगमनेर : विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच अग्रेसर असणा-या संगमनेर महाविद्यालयात सातत्याने विद्यार्थी पूरक विविध उपक्रम राबविले जातात. त्यातच भर म्हणुन वनस्पतीशास्त्र विभागातील कमवा आणि शिका योजनेतील ज्योती कडलग, अंजली देशमुख, प्रतिक्षा पवार व मुठे सीताराम या एम.एस्सीच्या विद्यार्थ्यांनी आळंबी उत्पादन करुन स्वयंरोजगाराचा नवीन मार्ग अवलंबला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळया कौशल्याचा विकास व्हावा व त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा म्हणुन वनस्पतिशास्त्र विभागाने वृक्ष दत्तक योजना, बोनसाय कार्यशाळा इ. अभिनव उपक्रम यावर्षी यशस्वीरित्या राबविले आहेत.

वनस्पती शास्त्र विभागातील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांनी आळंबी उत्पादन ही आगळी वेगळी संकल्पना राबवली आहे. ज्यामध्ये विद्यार्थी स्वयंप्रेरणेने आळंबीचे उत्पादन घेत आहेत व त्याची घरोघरी जाऊन विक्री करत आहे. त्यातुनच त्यांना अर्थाजन प्राप्त होत आहे. त्याचबरोबर हे विद्यार्थी नागरिकांना आळंबी खाण्याचे फायदे पटवुन देत आहेत. फास्ट फुडच्या जमान्यात आळंबीचे महत्त्व पटवुन देत एक वेगळा संदेश विद्यार्थी या माध्यमातुन देत आहेत. यातुन मिळालेल्या अर्थाजनातुन पुढील शिक्षण घेत आहेत व इतर विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण करत आहे.

याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.के.देशमुख म्हणाले की, संगमनेर महाविद्यालय हे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करत असते. वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी या उपक्रमांच्या माध्यमातुन शिक्षण, कौशल्य विकास, व्यावसायिकता व अर्थाजन करुन स्वावलंबी जीवनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. महाविद्यालयातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना आर्थिक मदत करणे व त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळया सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी व व्यवस्थापनातील सर्व सदस्य कटीबध्द असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

आळंबी या वनस्पतीच्या यशस्वी उत्पादनाबट्ठल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सचिव डॉ.अनिल राठी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.के.देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.संगीता जाधव आणि प्रा.महेश नवले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याचबरोबर विभागातील डॉ.ख्याडे एम.एस., प्रा.तांबे ए.एन., प्रा.पडवळ ए.डी., प्रा.हासे व्ही.बी., प्रा.जाधव आर.डी., संतोष सातपुते यांचेदेखील सहकार्य लाभले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)