संगमनेर मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी पडतानी तर व्हा.चेअरमनपदी लाहोटी

संगमनेर – ‘संगमनेर मर्चंट्स बँकेचे नूतन चेअरमन श्रीगोपाल पडतानी आणि नूतन व्हाईस चेअरमन सतीश लाहोटी ग्राहकाभीमुख कारभाराची उज्ज्वल परंपरा सांभाळून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेला अधिक वैभव प्राप्त करून देतील.’ असा विश्वास बँकेचे प्रमुख मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक राजेश मालपाणी यांनी आज येथे व्यक्त केला.

बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी के डी गायकवाड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जोशी यांच्या देखरेखीखाली शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता निवडप्रक्रिया संपन्न झाली. निवड जाहीर होताच गायकवाड यांच्या हस्ते उभयतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश राठी, गुरुनाथ बाप्ते,राजेश मालपाणी,श्रीगोपाल पडतानी, दिलीप पारख, सुनील दिवेकर, राजेंद्र वाकचौरे, डॉ. संजय मेहता, सतीश लाहोटी, राजेश करवा, प्रकाश कलंत्री, संतोष करवा, संदीप जाजू ,डॉ. सौ. अर्चना माळी, सौ. ज्योती पलोड आदी संचालक उपस्थित होते.

-Ads-

दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने  पडतानी व लाहोटी यांची बिनविरोध निवड झाल्याचे गायकवाड यांनी जाहीर केले. निवडीनंतर तळमजल्यावरील सभागृहात अभिनंदनाची विशेष सभा संपन्न झाली.यावेळी व्यासपीठावर मावळते चेअरमन प्रकाश राठी, मावळते व्हाईस चेअरमन गुरुनाथ बाप्ते, नूतन चेअरमन पडतानी, नूतन व्हाईस चेअरमन लाहोटी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सूरम आदी मान्यवर उपस्थित होते. मालपाणी यांनी आपल्या भाषणात मावळते चेअरमन राठी आणि व्हाईस चेअरमन बाप्ते यांच्या कारकीर्दीचा गौरव पूर्ण उल्लेख केला. त्यांनी प्रगतीच्या रथाला दिलेला वेग पुढील काळातही प्रगतीच्या आलेखाच्या रूपाने सर्वांना दिसणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटल.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)