संगमनेर : मनोली ग्रामपंचायतीच्या वतीने विविध झाडांचे वृक्षारोपण

कृषी दुतांकडून योग दिन साजरा

संगमनेर : सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून शासनाने वृक्ष लागवडीचा मोठा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमांतर्गत मनोली येथे ग्रामस्थ व लोणी येथील कृषी महाविद्यालय व राहुरी कृषी विद्यापीठाच्या संलग्नीत कृषी दुतांच्या वतीने वृक्षारोपण मोहिम राबवून योगासनांची प्रात्यक्षिके दाखवित साजरा केला.

या कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या सभापती निशाताई कोकणे, बेबीताई थोरात, गंगाधर विष्णू चव्हाण, काशिनाथ साबळे, गणपत शिंदे, प्रा. अमोल खडके, मुख्याध्यापक मोरे, सौ. उवला शिंदे, प्रभाकर बेंद्रे, गणपत शिंदे, ग्रामसेवक मिनाक्षी काळे, प्राचार्य एन.एस. दळे, प्रवरा कृषी महाविद्यालयाचे कृषीदुत आदि मान्यवर उपस्थित होते.

सभापती निशाताई कोकणे म्हणाल्या कि, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाचे हे 13 वे वर्ष आहे. रायाचे मा. महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. सुधीर तांबे व प्रकल्पप्रमुख दुर्गाताई तांबे व कांचनताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान लोकचळवळ झाले आहे. वृक्षसंस्कृती जोपासणार्‍या या चळवळीने देशपातळीवर लौकिक निर्माण केला आहे.प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा या चळवळीचे यश आहे.यामुळे वृक्षतोड टळली असून उजाड बोडखी डोंगरे झाडांनी हिरवीगार दिसू लागली आहे.

यावेळी प्रभाकर बेंद्रे म्हणाले कि, जगाच्या दृष्टीने ग्लोबल वार्मिंगची समस्या फार गंभीर आहे. शतकाच्या सुरुवातीला जगात या विषयावर चिंता व्यक्त केली जात आहे. तो विषय म्हणजे पर्यावरण,पर्यावरणाचे संरक्षण झाल्याशिवाय मानव सुरक्षित व सुखी होऊ शकत नाही. ग्रामीण भागातील युवक , ग्रामस्थ, यांनी पर्यावरणाचे काम जनआंदोलन चळवळ म्हणून उभे केले पाहिजे. जागतिक पर्यावरणाचा धोका वाढला असून यावर वृक्ष लागवड हाच उपाय आहे. बेसुमार वृक्षतोड, वाढलेले प्रदुषण यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत चालला आहे.यामुळे दुष्काळासारखी अनेक भिषण संकटे उभी राहत आहेत. भावी पिढ्यांचा विचार करुन पर्यावरण संवर्धनाचे काम प्रत्येकाने केले पाहिजे असे ही ते म्हणाले.

यावेळी कृषी दुतांनी योग प्रात्यक्षिके करुन ग्रामस्थांना योगाचे महत्व पटवून दिले. या उपक्रमात अविनाश ओहळ, विश्‍वास बारवे, अमोल कारंडे, नितीन पवार, श्रीधर रेड्डी, अक्षय यादव यांनी सहभाग घेवून विशेष पुरिश्रम घेतले. यावेळी प्रा. रमेश जाधव, प्रा. आर.बी. उंबरकर, वाल्मिक जंजाळ, प्रा. दिपाली तांबे आदींसह परिसरातील महिला,नागरिक,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)