संगमनेर : बोटा येथील कचेश्वर मंदिरात चोरी

संगमनेर – तालुक्यातील बोटा येथील कचनदी तिरावरील श्री कचेश्वर मंदिरातील दानपेटी चोरटयांनी फोडली,तसेच मंदिरातील साउंड मशिन शिस्टमची  देखील चोरी केली .शुक्रवारी रात्री साडेदहा ते शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बोटा येथे कचनदी तिरावर हे प्राचीन कचेश्वर मंदिर आहे. शुक्रवारी रात्री पूजा झाल्यानंतर हे मंदिर बंद करण्यात आले. शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुजारी व भाविक मंदिरात पूजेसाठी जात असता त्यांना  मंदिराच्या प्रवेशद्वाराचा आणि गाभाऱ्याच्या  कोंडा कापलेला दिसून आला.

त्यांनी मंदिरात जाऊन पाहिले असता त्यांना तेथील दानपेटी फोडलेली दिसून आली. चोरी झाल्याचा त्यांचा संशय बळावल्याने त्यांनी याबबत सरपंच विकास शेळके यांना कळविली. त्यांनी घारगाव पोलिसांना फोन द्वारे मंदिरात चोरी झाल्याचे सांगितले. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्यासह  पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांना दानपेटीत पैसे  न मिळाल्याने त्यांनी  मंदिरातील साउंड मशिन शिस्टम घेऊन पोबारा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)