संगमनेर : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

संग्रहित फोटो

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे परिसरात असणाऱ्या कारवाडी शिवारातील  मछिंद्र गंगाधर शिंदे या शेतकऱ्याच्या गोठ्यात असणाऱ्या शेळीवर बिबट्याने हल्ला करुन शेळीला ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. शिंदे कारवाडी शिवारात राहत आहेत. त्यांचा शेळीपालनचा गोठा आहे.

रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात शिरुन एका शेळीस पकडले. त्याचवेळी इतर शेळ्यांनी आवाज केल्याने शिंदे कुटुंब घराबाहेर आले व त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली. शिंदे यांनी गोठ्याकडे बॅटरीने पाहिले असता त्यांना गोठ्यात बिबट्या असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्याने त्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. घटनेची माहिती वनविभागाला समजताच त्यांनी घटनेचा पंचनामा केला. बिबटे जेरबंद होण्यासाठी वनविभागाने परिसरात पिंजरे लावावे अशी मागणी शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)