संगमनेर : बालभवनच्या मुलींची आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट नृत्य सादर करीत उघडली ‘बँकॉक’ची कवाडे

संगमनेर : संगमनेर येथील संस्कार बालभवनच्या मुलींनी पुण्यात झालेल्या राष्ट्रीय नृत्यस्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. देशभरातील वीस राज्यातून आलेल्या शेकडों स्पर्धकांत अफलातून भरतनाट्यम् सादर करीत बालभवनने वैयक्तिक व सांघिक अशा दोन्ही प्रकारात वर्चस्व निर्माण केले. अखिल भारतीय लोककला कल्चरल ऑर्गनायझेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट नृत्य सादर करीत बालभवनच्या मुलींनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ‘बँकॉक’ची कवाडे उघडली.

ऑल इंडिया डांस, ड्रामा, म्युझीक फेस्टिव्हल युनिव्हर्सल हार्मनी या शिर्षकाखाली पुण्यातील गणेश कला-क्रिडा ऑडिटोरिअममध्ये या स्पर्धा आयोजिण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत 20 राज्यातून आलेल्या एकुण 1350 स्पर्धकांचा सहभाग होता. संगमनेरच्या संस्कार बालभवनचे एकुण तीन संघ मिळुन तीस मुली यात सहभागी झाल्या होत्या. भारतीय नृत्यशैलीतील भरतनाट्यम् सादर करतांना बालभवनच्या नृत्यनाद व पद्मीनी या दोन संघांनी प्रथम तर नटराज समूहाने तृतीय पारितोषिक पटकाविले. या तिनही संघांच्या प्रशिक्षकांना सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

वैयक्तिक नृत्यप्रकारातही बालभवनने आपले वर्चस्व कायम राखले. उत्कृष्ट पदलालित्य, नेमकी देहबोली, डोळ्यांची हालचाल या जोरावर बालभवनच्या मुलींनी सादर केलेल्या एकुण सहा वैयक्तिक नृत्यांपैकी चार नृत्यांना प्रथम तर दोन नृत्याना तृतीय पारितोषिक देण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेत बालभवनने एकुण बारा सन्मानचिन्ह पटकावित भरघोस यश मिळविले. कुसुम इंगळे-गुंदेचा यांनी बालभवनच्या मुलींना मार्गदर्शन केले.

कोलकाता येथून आलेल्या प्रसिद्ध नृत्यांगणा किया चंदा आणि टॉलीवूडचे नृत्यदिग्दर्शक राजेश कपूर यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहीले. माजी महापौर प्रशांत जगताप, मराठी चित्रपट सृष्टीचे दिग्दर्शक रोहित नागभिडे यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. बालभवनने मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, बालभवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी यांनी मुलींचे अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)