संगमनेर बसस्थानकातून महिलेच्या पाकिटातून दागिने लंपास

एका चोराला नागरिकांचा चोप; पोलिसांनी केली अटक

संगमनेर – येथील बसस्थानक सध्या चोरट्यांचा अड्डाच बनला आहे. गेल्या दोन दिवसांतील घटना बघता बसस्थानक परिसर चोरट्यांचा “फेवरीट डेस्टिनेशन’ ठरले आहे. चोरीच्या दररोज घटना घडत असून, मंगळवारी प्रवाशांनीच चोरट्याला पकडून चांगला चोप दिला. या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संगमनेर शहरातील बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास एका महिलेच्या पाकिटातून 75 हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. याबाबत विजया मच्छिंद्र कोमेकर (वय-24, रा. चिंचवाडी, साकूर, ता. संगमनेर) या महिलेने अज्ञात चोरट्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पी. एन. देशमुख करीत आहे.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास बसस्थानक परिसरातच एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला नागरिकांनी चोप दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुनैना नरेश गुर्जर (वय-24, रा. भदयाना, जि. ढोलपूर, राजस्थान) या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी दिगंबर ज्ञानोबा बडे (रा. येळी, ता. पाथर्डी) याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरी करण्याचा प्रयत्न करताना नागरिकांनी त्याला रंगेहाथ पकडले. पोलिसांनी आरोपीला ताबडतोब अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास हे. कॉ. गोरे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)