संगमनेर : घारगाव महसुल मंडळाचे मंडलाधिकारी गुलाबराव कडलग यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा नुकताच संगमनेर येथील तहसिल कार्यालयातील सभागृहात पार पडला. संपूर्ण सेवाकाळात कोणत्याही प्रकारचा डाग किंवा साधी तक्रारही करण्याची संधी न दिलेल्या गुलाबराव कडलग यांनी तलाठी ते पदोन्नतीने मंडलाधिकारी या पदाचा सन्मा वाढविणारे कामकाज केल्याचे गौरोद्गार अनेकांनी काढले. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे २ जून १९६० साली काशिनाथ कडलग यांच्या शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या गुलाबराव यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण गावातील विद्यालयातच घेतले. त्यांच्या सहा भाऊ असलेल्या कुटूंबातील तीन शिक्षक, एक एस.टी महामंडळात, एक शेतकरी आहे. गुलाबराव १५ सप्टेंबर १९८३ रोजी तलाठी म्हणून नोकरीला लागले. त्यांनी तलाठी म्हणून श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले संगमनेर तालुक्यात काम केले. २०१६ साली घारगावचे मंडलाधिकारी म्हणून प्रमोशन झाले.

त्यांच्या कुटूंबात पत्नी, मुलगा अमोल प्राध्यापक, दोन मुली असे कुटुंब आहे. ३० जून २०१८ ला ते सेवानिवृत्त झाले. अतिशय शांत, संयमी स्वभाव, कायद्याच्या चाकोरीत राहून शेतकऱ्यांना कायम मदत करण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनावणे, नायब तहसीलदार अशोक रंधे, तलाठी संघटनाध्यक्ष प्रशांत हासे तसेच सर्व तहसिल कार्यालय कर्मचारी, तलाठी, मंडलाधिकारी अंभोरे, तळेगाव, अकोले घारगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)