संगमनेर : पठार भागात चोरट्यांचा धुमाकूळ

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागावरील पिंपळगाव देपा, साकूर, मांडवे बुद्रुक या तीन गावांमध्ये अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत रोख रक्कम, कपडे, गॅस टाक्या, एलसीडी आदी साहित्य चोरून पोबारा केल्याची घटना बुधवारी दि. १३ रोजी पहाटे व दुपारी घडली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामकृष्ण ममता सरोदे हे मांडवे बुद्रुक शिवारातील निम फाटा याठिकाणी राहत आहेत. त्यांच्या मालकीचे वेदांत ॲग्रो मॉल हे दुकान आहे. बुधवारी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला व ड्रॉव्हरचे लॉक तोडून त्यामधील रोख रक्कम ३५ हजार ३०० रूपये चोरून पोबारा केला आहे. तसेच साकूर गावातही रात्रीच्या वेळी चोरट्यांनी संजय चोपडा यांच्या मालकीचे असणारे कल्पना कलेक्शन दुकानाचे शटर उचकाटून आतमध्ये प्रवेश केला व दुकानातील साड्या, ड्रेस मटेरियल चोरुन पोबारा केला आहे. त्याचबरोबर पिंपळगाव देपा परिसरातील भास्कर वस्ती आदी ठिकाणी चोरट्यांनी बुधवारी दुपारी धुमाकूळ घालत दोन ते तीन घरांचे कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करुन गॅस टाक्या, एलसीडी आदी साहित्य चोरुन पोबारा केला आहे. रामकृष्ण सरोदे यांच्या वेदांत ॲग्रो मॉल दुकानामध्ये असणाऱ्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये तीन चोरटे कैद झाले आहेत. या चोरट्यांनी रुमालाने आपआपली तोंड झाकली होती. त्याचबरोबर ड्रॉव्हरमधून पैसे काढतानाही हे चोरटे दिसत आहे. त्यामुळे या चोरट्यांचा शोध लावणे पोलिसांना सोपे जाणार आहे. मात्र काही दिवसापूर्वी बोटा येथील एका कृषी सेवा दुकानात तीन चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते. मात्र अध्यापही घारगाव पोलिसांना त्या चोरट्यांचा शोध लावला नसल्याचे घारगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनकडून प्रश्नचिन्न उपस्तीत केले जात आहे.

या घरांमधून नेमका किती ऐवज गेला हे समजू शकले नाही. याप्रकरणी रामकृष्ण सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार एस.डी.वायाळ हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)