संगमनेर नव्या जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे

अकोले तालुका माजी सैनिक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अकोले – नगर जिल्ह्याच्या विभाजनात संगमनेर हाच नव्या जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे, अशी मागणी अकोले तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.
अकोले, संगमनेर तालुक्‍यात माजी सैनिकांची संख्या जास्त आहे. अकोले तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो. संगमनेर तालुक्‍याचाही बराच भाग आदिवासी व पठार भाग आहे. या दुर्गम तालुक्‍यात माजी सैनिकांची संख्या जास्त आहे. अकोले व संगमनेर तालुक्‍यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधव असलेल्या माजी सैनिकांना नगर तसेच इतर दूरच्या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या कामानिमित्त जाणे वार्धक्‍यामुळे शक्‍य होत नाही. तसेच, विधवा पत्नी यांनाही इतर जिल्हा ठिकाण दूर पडते, मोठे हाल होतात. संगमनेर जिल्हा झाला तर मोठ्या प्रमाणावर माजी सैनिक असलेल्या अकोले व संगमनेर तालुक्‍यातील माजी सैनिकांना सोईचे होईल. माजी सैनिक बोर्डाचे जिल्हा कार्यालय जवळ येईल. तसेच, इतरही प्रश्‍न सोपे होतील. तरी नगर विभाजनात संगमनेर जिल्हा होण्यासाठी आमच्या मागणीचा विचार व्हावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर जगताप, माजी अध्यक्षा अंजना खरबस, वीरपत्नी लहानबाई मालुंजकर, जिजाबाई मालुंजकर, उपाध्यक्ष रामनाथ कासार, शांताराम मालुंजकर, बाळासाहेब शेळके, सचिव दिलीप छल्लारे, विजय देशमुख, शांताराम लगड, बाळासाहेब देशमुख, दिगंबर देशमुख, ठमा मेंगाळ, सैनिक पत्नी कांता गोडे, सुनीता मेंगाळ,आशाताई चासकर, विद्या काळे, लीला चौधरी, शांता गवांदे, आर. के. डोंगरे, दामू टेमगिरे, दिलीप सावंत, दीपक भांगरे, दिलीप भडांगे आदींनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)