संगमनेर नगर परिषदेतर्फे नगर विकास दिन साजरा

संगमनेर – संगमनेर नगर परिषदेतर्फे शुक्रवारी नगर विकास दिन साजरा करण्यात आला. नगर विकास दिनाच्या निमित्ताने संगमनेर नगर परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.नगर विकास दिनाचे उद्घाटक म्हणून न.प. मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर उपस्थित होते. तसेच उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, आरोग्य समिती सभापती सोनाली शिंदे, पाणी पुरवठा सभापती नुरमहंमद शेख आदी उपस्थित होते.

याप्रसंगी शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी  सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी डॉ. अनिल जोशी, डॉ. विकास पाचोरे, डॉ. सुशांत गीते यांनी केली .याप्रसंगी मुख्याधिकारी सचिन बांगर यांनी नगर विकास दिनाचे महत्त्व सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)