संगमनेर : थोरात महाविद्यालयात पर्यावरण दिनी वृक्षारोपण

संगमनेर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये बकुल, कदंब, बहावा या मुख्य रोपांसह इतर अनेक फुलझाडांचीही लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. सुधीर तांबे उपस्थित होते. त्यांनी वृक्षारोपण केल्यावर आपल्या समोर असलेल्या पर्यावरण पेचावर भाष्य केले आणि संगमनेर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या दंडकारण्य अभियानाची माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी उपस्थितांचे स्वागत करून महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या ‘ग्रीन कॅम्पस क्लीन कॅम्पस’या बेस्ट प्रक्टिसबद्दल भूमिका कथन केली. प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. शिवाजी नवले, प्रा. जी. जे. थोरात तसेच डॉ. बाळासाहेब वाघ व मान्यवर उपस्थित होते. प्रा. शिवाजी नवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)