संगमनेर तालुक्‍यात लाल कांदा करपला

पठार भागात पाच हजार दोनशे हेक्‍टर क्षेत्र बाधीत
संगमनेर –  नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदाच्या हंगामाचा मुक्काम हलवून राज्यातून काढता पाय घेतला. यंदा संपूर्ण पावसाळा कोरडा गेल्याने संगमनेर तालुक्‍यातील पठार भागातील 5 हजार 200 हेक्‍टरवरील केलेली लाल कांद्याची लागवड करपल्याने शेतकऱ्यांची सर्वच स्वप्ने धूळीस मिळाली आहे.
यंदा गेल्या तीन वर्षातील नीचांकी पाऊस झाला आहे. जून महिन्याच्या सुरवातीला थोडाफार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेने कांदा लागवड केली. पठार भागातील नांदूरखंदरमाळ, जवळेबाळेश्वर, महालवाडी या गावांना कांद्याचे आगर म्हटले जाते. या भागातील सुमारे 90 टक्के कांदा पीक पावसावर अवलंबून आहे. चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कर्ज, उसनवारी करून मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र पावसाळ्याचे चार महिने उलटूनही समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे हजारो हेक्‍टरवरील कांदा व खरीप पिके करपली आहेत. लागवडीसाठी खर्च व बी-बियाणे, खते व शारीरिक कष्ट, परिश्रम व्यर्थच गेले आहेत. असंख्य शेतकऱ्यांनी उपलब्ध क्षेत्रानुसार एक ते बारा एकरापर्यंत कांदालावगड केली आहे. मात्र लावगडीनंतर पाऊस न पडल्याने कांदा लागवड उध्वस्त झाली आहे. सारोळे पठार, माळेगाव पठार, बावपठार, वनकुटे, माहुली, पिंपळगाव देपा, वरुडी पठार, पोखरी बाळेश्वर, कर्जुले पठार, डोळासणे या गावांमधील कांदा लागवड पाण्याअभावी करपली आहे. आता शेतकऱ्यांना दिवाळी दुरच, सावकारी कर्जाची चिंता भेडसावते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)