संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने परवानगी नाकारली असल्याची माहिती संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटि यांनी दिली.
संगमनेर तालुक्‍यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत चालला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने आता मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा सुधारविण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहे . तसेच मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सेमी इंग्लिश हा अभ्यासक्रम सुरु केला आहे तसेच गावागावात प्लेक्‍सबोर्डद्वारे व दवंडीद्वारे जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांना पुन्हा चांगले दिवस येऊ लागले आहेत.
संगमनेर तालुक्‍यात 26 इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासनाने परवानगी दिली आहे मात्र तालुक्‍यातील कुरण येथील इंदिरा इंटरनॅशनल इंग्लिश मेडीयम स्कुल तसेच चिंचोली गुरव येथील दि बुद्धिष्ठ सोसायटी इंग्लिश मेडीयम स्कुल या दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने परवानगी नाकारली असल्यामुळे या दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे आवाहन गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटि यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)