संगमनेर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

संगमनेर – संगमनेर तालुक्‍याच्या पठार भागातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आज माघारीच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठीच्या उमेदवारांमधील 4 जणांनी, तर सदस्यपदासाठी 11 जणांनी माघार घेतली आहे. प्रभाग दोन व चारमधील दोन महिला उमेदवार बिनविरोध घोषित झाल्या आहेत. 27 मे रोजी मतदान होणार आहे.

घारगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत 3331 लोकसंख्येपैकी 2240 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधील गाडेकर जया राजेंद्र (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री) व प्रभाग क्रमांक 4 मधील कान्होरे रूपाली रवींद्र (सर्वसाधारण स्त्री) बिनविरोध घोषित झाल्या आहेत, तर सरपंचपदासाठी अर्चना नितीन आहेर, ज्योती संतोष नाईकवाडी, उषा रमेश आहेर, प्रिया राहुल आहेर, या चार महिला रिंगणात आहेत.

उर्वरित चार प्रभागांतील 11 जागांसाठी प्रभाग 1 मधून – गाडेकर मनीषा नवनाथ व धात्रक संध्या संभाजी (नागरिकांचा मागास प्रवर्ग), आहेर मीनल गौरव, आहेर प्राजक्ता राहुल (सर्वसाधारण स्त्री), आहेर गणेश हनुमंता, धात्रक विजय रामचंद्र, आहेर संदीप शंकर (सर्वसाधारण पुरुष), प्रभाग 2 – मेंगाळ जनार्धन गंगाराम, भुतांबरे धोंडिभाऊ ठमा (अनुसूचित जाती), मधे इंदुबाई पोपट, भुतांबरे कांता अमोल (अनुसूचित जाती स्त्री), गाडेकर जया राजेंद्र (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), प्रभाग 3 – जाधव हेमंत दत्तात्रेय, धात्रक नीलेश दगडू (नागरिकांचा मागास प्रवर्ग), कडाळे विमल पांडुरंग, मेंगाळ सीताबाई मोहन (अनुसूचित जाती स्त्री), पिसाळ गोरख दशरथ, पिसाळ संतोष लक्ष्मण, आहेर सुनील दत्तात्रेय (सर्वसाधारण पुरुष), प्रभाग 4 – कान्होरे रूपाली रवींद्र (सर्वसाधारण स्त्री), कान्होरे राजेंद्र धोंडिभाऊ, आहेर रमेश माधव, पिसाळ दत्तात्रेय मारुती (सर्वसाधारण पुरुष) या प्रमाणे 22 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या महिला उमेदवारांपैकी तीन आहेर आडनावाच्या, तर नाईकवाडींची एक अशी संख्या आहे. घारगावच्या मतदारांमध्ये केवळ 530 मतदार आहेर आडनावाचे आहेत, तर आजवरच्या निवडणुकींमधील किंगमेकर असलेले शिवाजी नाईकवाडी यांनी त्यांची सून ज्योती सरपंचपदासाठी उभी केली आहे. आहेर विरुध्द इतर सर्व अशी अंतर्गत युती झाल्यास सरपंचपदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. तर, घारगाव शिवसेना शाखाप्रमुख संभाजी धात्रक यांच्या पत्नी संध्या यांनी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)