संगमनेर तालुक्‍याच्या पठार भागात दारु धंद्याचा उच्छाद

संग्रहित छायाचित्र......

संगमनेर – संगमनेर तालुक्‍याच्या पठार भागात बेकायदेशीर दारु धंद्यानी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे एकीकडे काही गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ दारुचा सुकाळ’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पठार भागातील बोटा, घारगाव, साकुर, आदी गावात बेकायदेशीर दारु धंद्यानी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे पुणे – नाशिक महामार्गावर खुल्ले आम दारु विक्री सुरु झाली आहे. त्यामुळे तरुणपिढी व्यसनाधीन झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या भागात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने ऐन पावसाळ्यात काही गावांमध्ये पाणी टंचाई आहे. मात्र दारुधंदे जोरात सुरु असल्याने पाण्याचा दुष्काळ असला तरी दारुचा सुकाळ असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
गुंजाळवाडी फाटा, साकुर फाटा – टाकळी रोड, साकुर – कौठे मलकापूर रोड, साकुर – नांदूर खंदरमाळ रोड वरील सर्रास ढाब्यावर बेकायदेशीर दारु विक्री सुरु आहे. अकलापूर, आंबी दुमाला, आंबी खालसा, माळेगाव, वनकुटे, डोळसणे, पिंपळगाव देपा, जांबूत, मांडवे या गावांमध्ये ठिकाणी दारु विक्री जोरात खुल्लीआम सुरु आहे. तसेच घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक हॉटेल व धाब्यावर दारु विक्री सुरु आहे.
या दारुधंद्यातून दररोज मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असल्याने दारु धंद्यावाल्यांनी या भागात दहशत माजवली आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यास ग्रामस्थ धजवत नाहीत. तसेच बहुतांशी पुढाऱ्यांनाच संध्याकाळी दारु लागतेय. त्यामुळे त्यांच्याकडूनही तेरी भी चूप और मेरी चूप अशी स्थिती आहे. अशी एका सर्वसामान्य ग्रामस्थाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. या बेकायदेशीर दारु धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून दारुधंदे बंद करावेत. अशी मागणी या भागातील महिला व ग्रामस्थांकडून होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)