संगमनेर तालुक्यातील भाविकांच्या गाडीला जुन्नर इंगळुण घाटात अपघात; एकाचा मृत्यू

संगमनेर-  जुन्नर येथील इंगळूण घाटात भाविकांना घेऊन जाणारा  पिकअप दरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले आहेत.हे सर्वजण संगमनेर तालुक्यातील महालवाडीचे आहेत. हे सर्व भाविक वरसूबाई देवीच्या दर्शनाला निघाले होते. प्रवीण (वय 35) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भाविकाचे नाव आहे. हा अपघात काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झाला. जखमींना पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील महालवाडी जवळील बाळेश्वर येथून हे भाविक वरसूबाई देवीच्या दर्शनाला निघाले होते. सर्वजण इंगळूण गावच्या पुढे आल्यानंतर पिकअपच्या मागील चाकाचा एक्सल तुटल्याने अपघात झाला. पिकअप दोन वेळेस उलटून दरीत कोसळला. या अपघातात 15 जण जखमी झाले. यामध्ये 6 महिला आणि दोन दहा वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे. यात प्रवीण निंदे याचा मृत्यू झाला. जखमींवर एका खासगी रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर सर्वांना पिंपरी-चिंचवड मधील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व भाविक एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)