मुंबई : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर जिल्हा करण्यात यावा, यासाठी सुरू असलेले संगमनेर जिल्हा कृती समितीचे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर मागे घेण्यात आले आहे.

गेल्या ४५ दिवसापासून जिल्हा कृती समितीचे आंदोलन सुरू होते, याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेऊन त्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत समितीने आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री म्हणाले, जिल्हा निर्मितीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीकडे आलेल्या माहितीचा भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने अभ्यास सुरू आहे. जिल्ह्याचे विभाजन करताना वैशिष्ट्यपूर्ण स्थळेभौगोलिक रचना व लोकसंख्याप्रशासकीय सोयी-सुविधा यांचा विचार करून समितीच्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)