संगमनेर : जागतिक वनदिनानिमित्त पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांचा सत्कार

संगमनेर – जागतिक वनदिनानिमित्त वनांचे रक्षण व संवर्धनासाठी संगमनेर उपविभागात सर्वोकृष्ट कार्य केल्याबद्दल सावरगाव तळ ( ता. संगमनेर ) पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांना, चंदनापुरीच्या निसर्ग परिचय केंद्रात झालेल्या जागतिक वनदिनाच्या कार्यक्रमात संगमनेरचे उपविभागिय वनाधिकारी मच्छींद्र गायकर यांच्या हस्ते विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सावरगाव तळ येथील वनाला मोठा वणवा लागला होता. नेहे यांनी गावातील युवकांना मदतीला घेत स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी सहा तासांच्या अथक परिश्रमातून वणवा विझवला होता. यामुळे गावच्या 500 हेक्टर वनक्षेत्रावरील वनसंपदेचे होणारे नुकसान टळले होते.

तसेच ते गावात विवेकानंद युवा जागृती प्रतिष्ठानामार्फत मृत झालेल्या व्यक्तींची अस्थी व रक्षा नदीपात्रात विसर्जित न करता, घरासमोर खड्डा खोदून त्यात टाकून मृत व्यक्तीच्या स्मृती सदैव चिरंतन ठेवण्याकरिता एक फळझाड लावून ते वाढवून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात क्रांतिकारी ठरलेल्या उपक्रमात योगदान देत आहेत.या सर्व कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे, वनपाल आर.बी. माने, आदिवासीसेवक  प्रा. बाबा खरात, प्रा. संपत डोंगरे, माधव वाळे, शिवाजी शेळके संगमनेर तालुक्यातील गावांचे संयुक्त वनकमिटी अध्यक्ष, सदस्य व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)