संगमनेर : जनार्धन आहेर यांच्या माध्यमातून ‘मोफत सामुहिक विवाह सोहळा संपन्न’…

वधू-वरांना रत्नागिरी हापूस आंब्याचे झाड भेट देताना रावसाहेब खेवरे व जनार्धन आहेर.

संगमनेर : पावसाळयात, पाऊस पडल्यावर सर्वच वनस्पती तरारुन उठतात तसा माणुसकीचा पाऊस सर्वत्र पडला तर प्रत्येक मनुष्य हा ‘माणूस’ म्हणून उभा राहील. माणुसकीची ही मुहूर्तमेढ म्हणजेच ‘सामुदायिक विवाह’ होय असे मानायला हरकत नाही. लाखो रुपयांची उधळपट्टी करुन लग्नाचा डामडौल साजरा करण्यापेक्षा सामुदायिक विवाह सोहळयात अल्प खर्चात मुलामुलींचे विवाह लावता येतात. घराण्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येत नाही आणि मानपानाचाही. संगमनेर तालुक्यातील पठार भागात सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांची जाण असणारे, युवा नेते व शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्धन म्हतारबा आहेर यांनी ‘मोफत लग्न’ लावून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. गेली ७ वर्षे तो अखंडपणे सुरू आहे. आता पर्यंत १२१ जोडप्यांचे शुभमंगल पार पडले असून या सर्व जोडप्यांचे कन्यादान स्वतः जनार्धन आहेर करत आहेत. यंदा १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर ७ जोडपे लग्नाच्या रेशीमगाठीत बांधली गेली आहेत.

मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याची सोय असलेला हा सामाजिक उपक्रम पठार भागातील पैशाअभावी रखडलेल्या गोर-गरीब  कुटुंबातील उपवर मुला-मुलीसाठी मोठा आधार बनला आहे. एक रुपयाही न घेता स्वखर्चातून आहेर यांनी अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर ७ जोडप्यांचे शुभमंगल पार पडून समाजापुढे सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. घराण्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी, मानपान मिळविण्यासाठी एका-एका विवाहावर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते आणि ही परंपरा आजही सुरू आहे. धनाढयांना, बडया राजकारण्यांना, उद्योजकांजवळ बक्कळ पैसा असल्याने त्यांना अशी उधळपट्टी करणे शक्य असते पण ज्यांची परिस्थिती बेताची, गरिबीची, मध्यम आहे अशी कुटुंबे सुद्धा लग्नावर मोठा खर्च करतात. त्यासाठी सावकार, बँकाकडून, जमिनी विकून पैसे उपलब्ध करतात व टोलेजंग विवाह साजरे करतात. यामुळे झालेल्या कर्जाचा बोजा उतरविण्यासाठी ही गरिब कुटुंबे आयुष्यभर काबाडकष्ट करत राहतात. हे वास्तव चित्र आहेर यांच्या लक्षात येताच त्यांनी मोफत सामुदायिक विवाह सोहळे साजरे करण्याचा निर्णय सात वर्षांपुर्वी घेतला आणि वडील म्हतारबा आहेर प्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा बुधवार १८ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सात वधुवरांचे मोफत विवाह संपन्न झाले. त्यामुळे वधू आणि वराच्या माता व पित्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. या प्रसंगी सातही वधू-वरांना रत्नागिरी हापूस आंब्याचे एक-एक झाड भेट देऊन या विवाह सोहळ्यातून वृक्ष संवर्धनाचाही संदेश देण्यात आला. यावेळी जनार्धन आहेर यांनी चालू केलेल्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे सर्वच मान्यवरांनी तोंडभरुन कौतुक केले.

-Ads-

यावेळी लक्ष्मी ट्रेडींग कंपनीचे बाळासाहेब गाडेकर, विश्वनाथ आहेर, शांताराम वाकळे, बाळासाहेब ढोले आदी उपस्थित होते. हा विवाह सोहळा पार पाडण्यासाठी संतोष गाडेकर, नितीन आहेर, निलेश आहेर, मनोज आहेर, एकनाथ मुंढे, नंदूशेठ कान्होरे, दत्ता हांडे, दत्ता गाडेकर, भाऊ आहेर, सचिन आहेर, दत्ता आहेर, संतोष कान्होरे, मंगेश कान्होरे, रमेश आहेर, हनुमंत आहेर, संभाजी आहेर, संतोष देवकर, सुदाम आभाळे, अशोक वाघ, वसंत वाणी, काबु वाकळे, नवनाथ वाकळे, धोंडिभाऊ ढोकरे, कोंडाजी ढोकरे, गोरख ढोकरे, बबलू खांडगे, अमित फटांगरे, देवचंद घुले, शरद घुले, उत्तम ढेरंगे, किरण शिरोळे, गणेश लेंडे, बाळासाहेब हांडे, दैवत आहेर, गोरख पिसाळ, अनिल डोके, ज्ञानेश्वर आहेर, हरिदास आहेर, डॉ.अभिषेक हांडे, बाळू ढुमणे, शांताराम खोल्लम, गणेश भोसले, रफिक सय्यद, रामनाथ चाचण, सद्दाम तांबोळी, विशाल आहेर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)