संगमनेर : चोरटयांनी घरात घुसून ४७ हजारांचा मुद्देमाल लांबवला

संगमनेर- शहरातील सय्यदबाबा उर्साला सुरुवात झाली असून, या  उर्साला दरवर्षीं लाखो भाविक येत असतात. कुटूंबातील सर्वजण या कार्यक्रमासाठी गेले असताना, मध्यरात्री चोरटयांनी घरात घुसून, सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शहरातील भारत नगर परिसरात  घडली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी गुलाम फारूक कुरैशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी त्यांचे बंधू व कुटुंबातील सदस्य सय्यदबाबा उरूस बघायला रात्री साडे दहाच्या दरम्यान गेले होते, मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास घरी परतले असता घरात ठेवलेल्या बॅगेतून सोन्या चांदीचे दागिने व रोकड गेल्याचे आढळून आले. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास हेकॉ. ए. आर. वाघ करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)