संगमनेर : घारगाव पोलिसांची अवैध दारू अड्ड्यांवर छापेमारी

दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून सुमारे तीन हजारांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर : काल संगमनेर तालुक्यातील पठारभागातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाया करत दोन वेगवेगळ्या ठिकाणावर छापे टाकत सुमारे तीन हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची व देशी संत्रा दारू जप्त केली असल्याची माहीत घारगाव पोलिसांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पो.स.ई. अन्सार इनामदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर संध्याकाळी चारच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात आरोपी शिवाजी नामदेव कौटे (वय २५, रा. मामेखेल ता. संगमनेर) हा आपल्या राहत्या घराच्या आडोशाला चोरून गावठी हातभट्टीची तयार दारू विक्रीच्या उद्देशाने ठेवलेली असताना त्याला रंगेहाथ पकडले.

तर दुसऱ्या घटनेत पोलिसांनी सायंकाळी सुमारे साडे पाच वाजेच्या दरम्यान टाकलेल्या छाप्यात तालुक्यातील वरुडीपठार येथे आरोपी बाळू रामभाऊ केदार (वय ३८, रा. वरुडीपठार ता. संगमनेर) याच्याजवळ सुमारे दोन हजार ऐंशी रुपये किंमतीची देशी संत्रा दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली आढळून आली. याबाबत घारगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध मुंबई प्रोव्हिजन कायदा कलम ६५ ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)