संगमनेर ; घारगाव ग्रामपंचायतीसाठी 88.88 टक्के मतदान

घारगाव येथील मतदान केंद्रावर उस्फुर्तपणे मतदान करताना मतदार. छाया :- नितिन शेळके
संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील घारगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी शांततेत 88.88 टक्के मतदान झाले. एकूण 3331 लोकसंख्येतील 2240 मतदारांपैंकी1991 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणूकीत सरपंचपदासाठी चार तर सदस्यपदासाठी अकरा उमेदवार रिंगणात होते.
प्रभाग प्रभाग दोन मधील जया गाडेकर व प्रभाग चार मधील रुपाली कान्होरे बिनविरोध घोषीत झाल्या आहेत. या निवडणूकीत शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्धन आहेर यांच्याविरुध्द काँग्रेसपक्षाचे अंतर्गत दोन गट असल्याने या सामन्यात, गेल्या १० ते १५ वर्षातील दांडगा लोकसंपर्क, राजकिय अनुभव व काँग्रेसमधील अंतर्गत गट यामुळे जनार्धन आहेर यांचे पारडे जड आहे.
सरपंचपदासाठी अर्चना नितीन आहेर व डॉ. प्रीया राहुल आहेर या दोन उमेदवारांमध्ये चुरस असल्याने, यावेळीही सरपंचपदाची माळ आहेरांच्याच गळ्यात पडणार हे नक्की आहे. या निवडणूकीत प्रभाग एक मध्ये 264 पुरुष, 237 महिला असे एकूण 501, प्रभाग दोन मध्ये 313 पुरुष, 268 महिला असे 581, प्रभाग तीन मध्ये 250 पुरुष व 238 महिला असे 488 तर प्रभाग चार साठी 236 पुरुष, 185 महिला असे 421 मतदान झाले.
मतदानाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडून गालबोट लागू नये यासाठी, प्रशासन सज्ज होते. घारगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली दोन उपनिरीक्षक आणि सोळा पोलिस कर्मचारी नियुक्त केले होते. शिवाय उपविभागिय पोलिस अधिकारी अशोक थोरात, तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी प्रत्यक्ष मतदानस्थळी भेट देवून पहाणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण अरगडे यांनी काम पाहिले. उद्या सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात होणाऱ्या मतमोजणीच्या सरपंच पदाचे भवितव्य ठरणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
62 :thumbsup:
6 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)