संगमनेर : घारगावमध्ये चोरी; ५४ हजारांचा ऐवज घेऊन चोरट्यांचा पोबारा

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील येथील बसस्थानक परिसरात असलेली  चार दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी  शनिवारी रात्री ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या चोर्‍यांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे चोरी झाल्याचे निदर्शनास येताच दुकानदारांना धक्‍का बसला. या घटनेमध्ये फॅशनोरा कपड्याच्या दुकानातून रोख रकमेसह सुमारे ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरण्यात आला.

छत्रपती संकुलन मधील रिजवान इस्माईल शेख याच्या फॅशनोरा कपड्याच्या दुकानाचे शेटर उचकटून दुकानातील २५ हजार किमतीचे टीशर्ट ,२७ हजार रुपये किंमतीच्या पँट  आणि २००० रोख रक्कम अशी  ५४ हजार रुपये किंमतीची चोरी करण्यात आली  तर जवळच असलेल्या टाकळी ढोकेश्वर पतसंस्थचे शटर उचकटत चोरटयांनी  तिजोरी फोडण्याचा प्रयत्न  केला मात्र  तिजोरी फोडता न आल्यानं, चोरट्यांनी शेजारीच असलेल्या दिलीप थोरात यांचे किरणा दुकान आणि सुरेश आहेर यांचे प्रियंका मेडिकलचे शेटर उचकटत गल्ल्यामधील  चिल्लर घेऊन  पोबारा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)