संगमनेर ग्रामपंचायतीस शरद आदर्श ग्राम पुरस्कार

जोगवडी – पुणे जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शरद आदर्श ग्राम पुरस्कार वितरणाचा सोहळा माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते संगमनेर ग्रामपंचायतीस प्रदान करण्यात आला. भोर-पुणे मुख्य मार्गालगत भाटघर धरणाशेजारी नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या संगमनेर गावातील ग्रामस्थ शेतीला प्राधान्य देत असून बारमाही बागायत पध्दतीने शेती केली जाते. सिंचनासाठी गावात नीरा नदीवर 30 लिफ्ट, 15 खाजगी बोअरवेल आणि 20 विहीरी खोदल्या असून, फळबाग, भाजीपाला, ऊस आणि भात आदी पिके घेतली जातात, अशी माहिती ग्रामपंचायतच्या उपसरपंच रेश्‍मा बांदल यांनी दिली. दरवर्षी जिल्हा परिषदेकडून शरद आदर्श ग्रामपुरस्कार दिला जातो. यावर्षी वितरणाचा कार्यक्रम (दि. 24) पुणे येथे माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या हस्ते झाला असून, कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, सर्व जिल्हा परिषद सदस्य, संगमनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंच रेश्‍मा बांदल, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्ती अध्यक्ष सचिन बांदल आणि ग्रामसेवक प्रसाद सोले उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
12 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
3 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)