संगमनेर खुर्द येथे डाळिंब उत्पादकांची कार्यशाळा

संगमनेर – येथील राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने मंगळवारी (दि.29) डाळिंब उत्पादकांच्या कार्यशाळेचे आयोजन संगमनेर खुर्द येथील कुबेर एम्पायर (खांडगाव फाटा) येथे सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. यामध्ये “डाळिंब शेती समोरील आव्हाने’ हा विषय ठेवण्यात आला आहे. त्यावर या क्षेत्रातील विविध तज्ञ अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेचे उद्‌घाटन माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व आमदार सुंधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विस्तार व शिक्षण संचालक किरण कोकाटे “आत्मा’चे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यशाळेत पुणे येथील कृषी महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता विजय सुपे हे एकात्मिक डाळिंब बाग व्यवस्थापन, सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे, रोगशास्त्र विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ ज्योत्स्ना शर्मा या डाळिंबावरील प्रमुख रोग उत्पत्ती कारणे व उपाय, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृदु विज्ञान व रसायन शास्त्र विभागाचे अनिल दुगुडे हे डाळिंबातील एकत्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, महात्मा फुले विद्यापीठातील किटक शास्त्र विभागाचे अशोक वाळुंज डाळिंबावरील प्रमुख किडींचे व्यवस्थापन, सोलापूरच्या राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्रातील डाळिंब प्रक्रिया विभागातील निलेश गायकवाड डाळिंब पिकातील मूल्यवर्धन आणि पुणे येथील पणन महामंडळाचे फलोचांदन विकास अधिकारी अजय कुदळे डाळींब निर्यात बंदी प्रमाणीकरण या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेचे आयोजन संगमनेर तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व संगमनेर तालुका ऍग्रो प्रोसेसिंग ऍण्ड मार्केटिंग को-ऑप सोसायटी लिमिटेड यांनी केलेले आहे. या कार्यशाळेचा लाभ संगमनेर उपविभाग व अन्य विभागातील जास्तीत जास्त शेकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे व तालुका कृषी अधिकरी कारभारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)