संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी शिवारातील जावळे वस्ती येथे कारने पायी चालणाऱ्या पादचाऱ्यास जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. सदर घटना बुधवार दि. २३ मे रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली. बाबासाहेब रामकृष्ण सातपुते (वय-५५, रा.जावळे वस्ती) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कार क्रमांक एमएच १४ जीएच ०११६ ही पुण्याहून आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने येत होती. ही कार जावळे वस्ती याठिकाणी आली असता त्याच दरम्यान रस्त्याने पायी जात असणारे बाबासाहेब सातपुते यांना जोराची धडक दिली. त्या अपघातामध्ये सातपुते यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिसांनी कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)