संगमनेर : आंबी-दुमाला येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

संगमनेर- तालुक्यातील आंबी-दुमाला येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त शनिवार पासून रोकडेश्वर मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकडा व आरती सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी नेमाचे भजन सायंकाळी प्रवचन, हरिपाठ व रात्रौ हरिकीर्तन नंतर हरिजागर हे कार्यक्रम होणार आहे.

या सप्ताह दरम्यान ह. भ शुभम महाराज नरवडे, विजय महाराज ढेरंगे, बापू महाराज शेळके, तुकाराम महाराज कुरकुटे, विष्णू महाराज ढेरंगे, दत्ता महाराज बोरकर तर ३१ मार्च रोजी हनुमान जयंती निमित्त शेरणी मिरवणूक, पालखी मिरवणूक निघणार आहे. तर रविवारी १ एप्रिल रोजी ह.भ.प बन्सी महाराज काळे यांचे काल्याचे कीर्तनाने या अखंड हरीनाम साप्ताहाची सांगता होणार आहे. ३१ मार्च रोजी संस्कार प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित  राहण्याचे आव्हान ग्रामस्थांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1130 :thumbsup: Thumbs up
46 :heart: Love
0 :joy: Joy
179 :heart_eyes: Awesome
124 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)