संगमनेर : अकलापूर विद्यालयात रंगला झाडांचा पहिला वाढदिवस

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील श्री दत्त विद्यालयाने गावातून ढोल ताश्यांच्या गजरात वृक्षदिंडी काढून पर्यावरणपूरक घोषणा देत, विद्यालयाच्या आवारातील अकरा झाडांचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. तसेच विद्यालयाच्या आवारात नविन पन्नास झाडे लावीत ‘वृक्ष मित्र पुरस्कार’ हा उपक्रम मंगळवार दि. 10 पासून राबविण्यात येणार आहे.

गावातून काढलेल्या फेरीत वृक्षांच्या पोशाखातील मुलांचा सहभाग होता. ज्या मुलांचे झाड एक वर्षात जास्त वाढेल त्याला ‘वृक्ष मित्र पुरस्कार’देवून, सन्मानित केले जाणार असल्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. विद्यार्यांनी विद्यालयाच्या आवारात लावलेल्या 50 झाडांची जबाबदारी स्वत: घेत असल्याचे यावेळी जाहीर केले. तसेच झाडे लावाल तर पाऊस पडेल, पाऊस पडला तरच आपण जगू असे सांगून, गावात होणारी वृक्षतोड थांबविण्याचा निश्चय केला.

विद्यालयातील प्राचार्य बाळासाहेब आहेर यांनी झाडांच्या वाढदिवसाची कल्पना मांडली. सरपंच वेणू दुधवडे यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. गावातील लहान बालकांच्या हस्ते केक कापण्यात आला. या कार्यक्रमासाठी झाडांची सजावट करून त्यास फुगे लावले होते. यावेळी वृक्ष लागवड अभियानांतर्गत विद्यालयात 50 नवीन झाडे लावण्यात आली. यावेळी अरुण वाघ, संतोष पवार, प्रा. बाबा खरात, शिवाजी तळेकर, हिरालाल आभाळे, सीताराम आभाळे, वसंत आभाळे, संदीप आभाळे, सुरेश कुऱ्हाडे, संतोष देवकर, भास्कर देवकर, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)