संगमनेरात स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील कासारा दुमाला येथील 50 वर्षांचा पुरुषाचे स्वाईन फ्लूने सोमवार दि.1 ऑक्‍टोबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. तालुक्‍यातील स्वाईन फ्लूने घेतलेला हा सातवा बळी ठरला आहे. अस्तगांव (ता. राहता) येथे व्यवसायानिमित्त ते राहत होते. लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल आल्यानंतर माहिती देणार असल्याचे सांगितले आहे. आज सकाळी कासारा दुमाला येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)