संगमनेरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद…

संगमनेर : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला संगमनेरात सुरुवात झाली असून शहरातील बहुतांश भाग पूर्ण बंद आहे. बस स्थानकावरील बस सेवा बंद असून संपूर्ण शहरासह पुणे – नाशिक व कोल्हार घोटी महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त आहे. सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. आज शहरात सकाळीच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रभात फेरी काढून बंदचे आवाहन केले.

शहरातील दुकानदार, व्यापारी यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. आज सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोटारसायकल रॅली काढली. मोठ्या संखेने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेतला होता. तालुक्यातील ग्रामीण भागातील घारगाव, निमगावजाळी, तळेगाव दिघे, वडगावपान सह सर्वच गावांमध्ये शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येत आहे. या बंदला पाठिंबा देत अमृत उद्योग समूहाने आज कडकडीत बंद ठेवून पाठींबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)