संगमनेर : संगमनेर शहरातील अतिशय गजबजलेल्या नेहरू चौक याठिकाणी उघड्यावर चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर संगमनेर शहर पोलिसांनी ९ जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास छापा टाकत सात जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी कि, शहरातील नेहरू चौक भागातील भाजी बाजारजवळ गुरुद्वाराच्या आडोशाला काहीजण तिर्रत नावाचा पत्त्याचा जुगार खेळात असल्याची गुप्त माहिती पोनि. सुनील पाटील यांना मिळाली. त्यानुसार सहा. पोनि. गोपाळ उंबरकर यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह सदर ठिकाणी छापा टाकला असता याठिकाणी आरोपी जयसिंग देविदास दुधे (वय-५० रा. घास बाजार संगमनेर), संजय मुरलीधर मदने (वय-५३ रा. संगमनेर खुर्द, संगमनेर), रमेश शिवा पवार (वय-२९ रा. गुंजाळवाडी, संगमनेर), रामदास छबू बर्डे (वय-४५ रा. सुकेवाडी ता.संगमनेर), देविदास जगन्नाथ शेळके (वय-५५ रा. परदेशपुरा, संगमनेर), विठ्ठल गणपत नारायणे (वय-४० रा. दिल्ली नाका, संगमनेर), दत्तू जिजाबा पाटोळे (वय-६२ रा. सुकेवाडी ता.संगमनेर) अशा सात जणांना तिर्रत नावाचा हारजीतचा जुगार पैसे लावून खेळत असताना पकडले.

याठिकाणाहून सुमारे पाच हजार चाळीस रुपयांच्या रोख रकमेसह जुगाराचे साहित्य पोलिसांना मिळून आले आहे. याबाबत शहर पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात मुंबई जुगार कायदा कलम १२ अ नुसार गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोनि. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. सानप करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)