संगमनेरात ग्रंथगौरीचा आगळावेगळा उपक्रम

संगमनेर, (प्रतिनिधी)- सध्या संगमनेर शहरात सर्वत्र गौरी गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. गौरी समोरील रांगोळ्या, पानाफुलांची सजावट, फराळाचे पदार्थ आणि आकर्षक खेळण्यांची सजावट यात अधिकाधिक नाविन्य कसे आणता येईल, याचा प्रयत्न घराघरातून केला जात आहे. गौरी समोरील सजावटीत असेच वेगळेपण आणण्याचा प्रयत्न येथील वैशाली संतोष खेडलेकर यांनी व त्यांची कन्या वैष्णवी यांनी केला आहे. त्यांनी मराठी साहित्यातील स्त्री केंद्रित विविध चरित्र,आत्मचरित्र,कादंबऱ्या यांची आकर्षक सजावट गौरीसमोर करून “ग्रंथगौरी’ ही संकल्पना राबविली आहे.

गौरीच्या हळदीकुंकू समारंभासाठी स्त्रिया एकमेकींच्या घरी जातात. त्यावेळी गौरीसमोरील सजावट, रांगोळ्या यांची हमखास चर्चा होते. अशावेळी त्यांना काहीतरी दाखवावे यासाठी ग्रंथगौरी ही संकल्पना राबविल्याचे खेडलेकर यांनी सांगितले. मराठी कलाक्षेत्रातील लता मंगेशकर, स्मिता पाटील, नर्गिस, मधु कांबीकर, कांताबाई सातारकर, मधुबाला, माणिक वर्मा, नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफजाई, भारतातील पहिल्या महिला डॉक्‍टर आणि संगमनेरच्या स्नुषा डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक, मदार तेरेसा, साधना आमटे, संत मीरा, कुंती, आदींशी संबंधित ग्रंथ गौरीसमोर मांडून ही सजावट करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)